अभ्यासात एकाग्रता हा अनेक पालकांचा चिंतेचा विषय असतो. योग्य दिशा आणि वातावरण असलेली अभ्यासाची जागा मुलांना लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते.
अभ्यासाच्या खोलीची दिशा
पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेतील खोली अभ्यासासाठी उत्तम मानली जाते. पश्चिम दिशाही चालू शकते. नैऋत्य आणि आग्नेयमध्ये अभ्यासाची खोली टाळावी.
टेबल आणि बसण्याची दिशा
- अभ्यास करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
- पाठीमागे भक्कम भिंत असावी, खिडकी किंवा दार नसावे.
- टेबल भिंतीला अगदी चिकटून न ठेवता थोडे अंतर ठेवावे.
- टेबलावर पुस्तकांचा पसारा नसावा, फक्त आवश्यक वस्तू ठेवाव्यात.
- टेबल बीमखाली नसावे.
रंग आणि प्रकाश
हलका हिरवा, हलका पिवळा किंवा क्रीम रंग अभ्यासाच्या खोलीसाठी चांगले. नैसर्गिक प्रकाश डावीकडून यावा. रात्री टेबल लॅम्प वापरावा.
इतर सूचना
अभ्यासाच्या खोलीत टीव्ही किंवा व्हिडिओ गेम ठेवू नयेत. सरस्वती देवीचा फोटो किंवा प्रेरणादायी चित्र ईशान्य भिंतीवर लावता येते.



