क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आधीच चिंतेत असते. शांत, स्वच्छ आणि सकारात्मक वातावरण रुग्णांना दिलासा देते आणि डॉक्टरांवरील विश्वास वाढवते.
डॉक्टरांची केबिन
- डॉक्टरांची केबिन नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम भागात असावी.
- रुग्ण तपासताना डॉक्टरांचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे.
- रुग्णाची तपासणी करणारा बेड दक्षिण-पश्चिम भागात असावा.
इतर विभाग
- प्रतीक्षा कक्ष: ईशान्य, उत्तर किंवा पूर्व भागात, मोकळा आणि प्रकाशमान.
- रिसेप्शन: प्रवेशद्वाराजवळ, ईशान्य किंवा पूर्व भागात.
- औषध साठवण: उत्तर किंवा ईशान्य भागात.
- एक्स-रे, लॅब व उपकरणे: आग्नेय किंवा दक्षिण भागात.
- ऑपरेशन थिएटर: पश्चिम भाग योग्य मानला जातो.
वातावरण
हलके हिरवे, पांढरे आणि हलके निळे रंग वापरावेत. प्रतीक्षा कक्षात झाडे आणि निसर्गचित्रे ठेवल्यास वातावरण प्रसन्न राहते.



